विहिरीतल्या पाण्याची मालकी कोणाची
एकदा एका माणसाने आपली विहीर गावातील एका शेतकऱ्याला विकली. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी विहिरीतील पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ आला तेव्हा त्या माणसाने शेतकऱ्याला विहिरीतील पाणी काढण्यासाठी मनाई केली आणि म्हणाला मी तुला हि विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, हे ऐकून तो शेतकरी दुःखी झाला आणि मदत मागण्यासाठी अकबराकडे गेला.
बादशहा अकबराने थोडा विचार करून बिरबलाला दरबारात बोलावले आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सांगितले.
सर्व हकीकत ऐकल्यानंतर बिरबलाने त्या माणसाला बोलावले ज्याने शेतकऱ्याला विहीर विकली होती. नंतर त्या माणसाला विचारण्यात आले की तू शेतकऱ्याला या विहीरीतून पाणी का काढून देत नाहीस तू तर ही विहीर शेतकऱ्याला विकली आहेस ना?
तेव्हा तो म्हणाला मी शेतकऱ्याला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही.
तेव्हा बिरबल हसत म्हणाला की तू फक्त विहीरच शेतकऱ्याला विकली आहेस आणि पाणी नाही तेव्हा तुला या विहिरींमध्ये पाणी ठेवण्याचा काहीही अधिकार नाही तेव्हा तू लगेच या विहिरीतील पाणी काढून ने नाहीतर त्याचे व्याज शेतकऱ्याला दे.
एवढे ऐकून तो माणूस समजला की आपले या महाचतुर माणसासमोर काहीही चालणार नाही तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली आणि त्या शेतकऱ्याला व्याजही दिले. बिरबलाच्या या न्यायावर अकबर ही खुश झाला.
Recent Comments