सर्व धर्म समान
अकबराच्या दरबारातील काही सभासद बिरबलावर जळत असत. अकबर स्वतः मुसलमान असूनसुद्धा तो एका हिंदूचा आदर करतो. हे बाकीच्या सभासदांना आवडत नसे.
अकबर बादशहा मात्र आपल्या राज्यातील सर्व जनतेला आपल्या मुलाप्रमाणे समजत तसेज कोणत्याही जाती मध्य भेदभाव मानत नसे. सर्वांवर सारखेच प्रेम करत.
बादशहाचे काही सभासद बिरबला विरुद्ध नेहमी कान भरत. बादशहाला माहीत होते की हे बिरबलावर जळत आहे.
एके दिवशी सर्वाच्या बुद्धीची परिक्षा घेण्याची वेळ आली. बाहेर देशावरून काही व्यापारी आले होते. त्यांनी बादशहाला आपला सलाम सांगितला.
बादशहाने त्यांची विचारपूस करण्यासाठी आपल्या सभासदांना पाठवले. काही वेळाने ते तिन सभासद आले, जे बिरबलावर जळत असे.
पहिला – ते व्यापारी दूर देशातून आले आहेत.
दुसरा – त्यांच्या देशातील सामान आणले आहे. ते इथे इकण्याची त्यांची इच्छा आहे.
तिसरा – ते आपल्या इथे व्यापार करण्यासाठी आले आहेत. बादशहाने त्यांच्या बरोबर बिरबलाला सुद्धा पाठवले होते. बिरबल विचारपूस करून काही वेळाने तेथे आले.
बादशहा – केली का विचारपूस.
बिरबल-महाराज ते व्यापारी आहेत.इराण मधून आले आहेत. ते जहाजाने प्रवास करत आले आहेत. आपल्या बरोबर त्यांनी त्यांच्या देशातील तयार कपडे तसेच कामसाचे सामान आणले आहे. ते सामान त्यांना येथे विकायचे आहे. त्या बदल्यात ते आपल्याला कर सुद्धा देतील, तसेच आपले सामन विक्री करून त्या बदल्यात ते आपल्याकडील मसाल्याचे पदार्थ घेणार आहेत. त्यांना त्यांच्या प्रवासात काही त्रास झाला नाही.
बादशहा – बघीतलत तुमच्यात आणि बिरबलामध्ये काय फरक आहे.
त्या सभासदांना कळले की जाती भेदावरून भाडण्यापेक्षा तसेच दुसऱ्यावर जळण्यापेक्षा आपण आपल्या बुद्धीचा विकास करून आपल्या देशाचा विकास केला पाहिजे.
Recent Comments