सर्वात चांगले पाणी
उन्हाळ्याचे दिवस होते. राज्यात पाण्याची समस्या जाणवू लागली होती.
बादशहा ने विचारले – सगळ्यात चांगले पाणी कोणत्या नदीत आहे
बिरबल – सरकार यमुना नदीत.
बादशहा – काय? यमुना नदीत मनात येईल ने उत्तर तू देत आहेस तूमच्या वेद-पुराणात तर गंगाजलाचा महिमा सांगितला आहे.
बिरबल – होय! गंगाजल अमृत आहे त्याची बरोबरी कोणाशी ही होऊ शकत नाही. बादशहा उत्तर ऐकून संतुष्ट झाले.
तंबाकू
बिरबलाला तंबाकू खाण्याची सवय होती. पण राजाला ते आवडत नसे. बिरबलाची तंबाकू सोडवण्यासाठी बादशहाने एक युक्ती केली.
बादशहा बिरबलला तंबाकूच्या शेतात घेऊन गेले तिथे एक गाढव गवत खात होते.
बादशहा – बघ बिरबला गाढव सुद्धा तंबाकू खात नाही बघीतलस तंबाकू खाणे हे कीती खराब आहे.
बिरबल – बरोबर आहे. गाढव तंबाखू खात नाही.
बिरबलाची बुद्धी
एके दिवशी बादशहाने एका कागदावर पेनसिलने एक मोठी रेघ काढली आणि बिरबलाला सांगितले ही रेघ न पुसता लहान करायची आहे. बिरबलाने जास्त वेळ न लावता लगेच त्या रेघेशेजारी एक त्याच्या पेक्षा मोठी रेघ काढली.
बिरबल – पहा महाराज आपली रेघ लहान झाली. हे पाहून बादशहा बिरबलाच्या बुद्धीवर खूष झाला.
Recent Comments