वाघाचे दुध
अकबर बादशहाच्या दरबारातील बरेचसे सभासद बिरबलावर जळत असे. त्या सभासदांना वाटते की बिरबलामुळे बादशहा आपल्याकडे लक्ष देत नाही.
एके दिवशी दरबारातील एका सभासदाने बिरबलाचा नाश करण्यासाठी एक योजना आखली. त्याने बादशहाच्या एका बयकोला व वैद्याला आपल्या योजनेत सामिल केले. ही योजना पूर्ण करण्यासाठी राणिला त्याने आजारी पडण्याचे नाटक करण्यास सांगितले. तसेच त्यांना तपासणाऱ्या वैद्याला काही मोहरा दील्या व त्याला सांगितले की राजाला जाऊन सांग की राणि तेव्हाच बरी होईल, जेव्हा उत्तरेकडील जंगलातील वाघाचे दुध पेईन.
– अकबर बादशहाने ही गोष्ट आपल्या दरबारामध्ये सांगितली. जो कोणी राणि साठी वाघाचे दुध आणेल त्याला एक हजार मोहरा बक्षीस दिल्या जातील.
बिरबलावर जळणाऱ्या सभासदांनी सांगितले महाराज! -बिरबलच वाघाचे दुध घेऊन येईल. ते खूप हुशार व धाडसी आहे.
बादशहाने बिरबलाला वाघाचे दुध आणायला सांगितले. बिरबल घरी गेला दरबारात घडलेली गोष्ट आपल्या मुलीला सांगितली.
मुलगी – आपण काळजी करू नका. आपण काही दिवस दरबारात जाऊ नका. बिरबल बरेच दिवस दरबारात आला नाही. बादशहाने बिरबलला बोलवण्यास शिपयाला पाठवले. शिपाई बिरबलाच्या घरी गेला. त्याच्या मुली ने शिपायास सांगितले ते प्रसूती गृहामध्ये आहेत. ते आत्ताच येऊ शकत नाही. हा निरोप घेऊन शिपाई दरबारात आला. व बादशहाला तो निरोप सांगितला.
बादशहाला सर्व काही समजले व बादशहाने त्या वैद्याला शिक्षा केली.
Recent Comments