मेनाचा पुतळा
बादशहा – तूमच्या ग्रंथामध्ये लिहले आहे की सुदामा आपल्या राज्यात आलेचे कळताच त्यांना राजवाड्यात आणण्यासाठी ते स्वतः पळत गेले न पायात त्यांनी चप्पल घातली, त्यांच्याकडे नौकराची कमी – होती का ? याचे कारण सांगू शकतोस का ?
बिरबल – याचे उत्तर मी योग्यवेळी देईन.
एके दिवशी बिरबलाने मेनाचा पुतळा तयार केला तो राजाच्या नातवासारखा दिसत होता. त्या पुतळ्याला कपडे घातले लांबून तो राजकुमार दिसू लागला. त्या पुतळ्याला नौकराकडे दिले व सांगितले की जेव्हा तू बदशहाकडे जाशील तेव्हा तू घसरल्याचे नाटक कर व हा पुतळा शेजारील तलावात टाक, नौकराने तसेच केले.
बादशहा समोर येताच त्याने घसरल्याचे नाटक केले व मूर्ती पाण्यात टाकली.
बादशहा ने पळत जाऊन तलावात उडी मारली त्या मेनाच्या पुतळ्याला बाहेर काढले तेव्हा बिरबल तेथेच उभा होता.
बिरबल – बघीतलस महाराज आपल्याकडे नौकर-चाकर असून सुद्धा आपण स्वतः पायी जाऊन आपल्या नातवासाठी अनवाणी पळत जाऊन, अशा वेळी तुमची सवारी घोडागाडीची काय आवशकता होती. बिरबलाने आणखी पूढे सांगितले ज्या प्रकारे तूम्हाला तुमचा नातू प्रिय आहे त्याच प्रकारे श्रीकृष्ण सुद्धा आपल्या भक्तावर प्रेम करत असे.
Recent Comments