भेंट
एकदा अकबर दिल्लीवरून येत असताना इलाहाबाद मधील गंगा नदीच्या काठी मुक्कामाला थांबले. त्या दिवशी बादशहाने आपल्या एका शिपायाला पत्र घेऊन झासीच्या राजाकडे पाठवले. ते पत्र शिपाई झासीच्या राजाकडे घेवून गेला झासीच्या राजाने ते पत्र वाचले त्यात लिहले होते. (आपण मला भेट दयावी) झासीचा राजा घाबरला त्यांना वाटले, अकबर आपल्या छोट्याशा राज्यावर स्वतःता अधिकार मागेल.
झासीच्या राजाने दीरबलला बोलावले व ते पत्र दाखवले व बीरबलला सांगितले की आपण काय करावे. बिरबलाला त्या पत्रातील अर्थ समजला होता.
बिरबल – महाराज अकबर! आपल्या राज्यावर अधिकार मागत नाही.
राजा – मग काय अर्थ आहे त्या पत्राचा?
बिरबल – आपण काळजी करू नका. बादशहाने कोणत्या इच्छेने बोलावले आहे त्याची उपाययोजना मी करतो.
राजा – तुला जसे योग्य वाटते तसे कर.
बिरबल – आपण बादशहाला भेटण्याची तयारी करा, मी | माझ्या तयारीला लागतो…
बिरबलाने वीटा, दगड तसेज चुना इत्यादी व बांधकामातील मीस्त्री या सर्वांना गंगेच्या किनारे येण्यास सांगितले बिरबल। राजवाडयात परत आला.
बिरबल – महाराज आपण दोन-तिन तासांनी जाऊ
राजा – आपल्याला उशीर झाला तर सम्राट अकबर नाराज होतील.
बिरबल – सम्राट अकबर बादशहा नाराज होणार नाही.
काही वेळाने झासीचा राजा व बिरबल अकबराला भेटण्यास शाही जहाजाने गेले. थोड्याच वेळात ते दोघे अकबर बादशहा जवळ पोहचले,” अकबर बादशहाने त्यांना आपल्या बरोबर बसवले त्यांची विचारपूस केली.
चौपट राजाने बादशहाला हात जोडून नमस्कार केला.
चौपट राजा (झासीचा राजा) – महान सम्राटाने माझ्या सारख्या गरीबाची कशी आठवण काढली? पण महाराज मला अजन समजले नाही की माझ्या छोट्या राज्याने आपल्याला काय मिळेल?
तेवढ्यात अकबर बादशहा हसून म्हणाले आपण जो विचार करत आहात तसे काही नाही पण…
पण… पण काय ? महाराज – चौपट राजाने विचारले.
बादशहा – मी फक्त तूम्हाला बोलावले होते. मग तुम्ही यायच्या आदी या दगड, चूना, बांधकाम करणारे मिस्त्री कशासाठी पाठवले.
चौपट राजा – सम्राट याबद्दल मला काही माहीत नाही. सर्व काही आमचे मंत्री बिरबल सांगेल. अकबराने बिरबलाला विचारले आपण हया वीटा दगड चूना कशासाठी पाठवला?
बिरबल – महाराज! आपण आमच्या महाराजांना याच उद्देशाने बोलवले होते. आपली इच्छा या तिन नदीच्या किनाऱ्यावर एक विशाल महाल बनवायची होती.
अकबर बादशहाने बिरबलाची बुद्धी ओळखली तसेच अकबर बादशहाने आपल्या राज्यात बिरबलाला घेऊन जाण्याचा विचार केला.
अकबर बीरबलाला घेऊन दिल्लीला आले. बिरबल खुप हुशार व बुद्धिवंत होने ते अकबर बादशहांच्या नऊ रत्नापैकी एक होते. अकबर बादशहाच्या विचित्र प्रश्नांची उत्तरे तो आपल्या बुद्धीच्या जोरावर सहज पणे देत असे.