भावा सारखा
“अकबर बादशहा खूप लहान होते, तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. ते खूप छोटे होते त्यामुळे त्यांना आईचे दूध गरजेचे होते. दरबारातील एक दासी होती, तिला एक लहान मुलगा होता व ती त्याला दूध पाजत असे. ती लहान अकबरला दूध पाजायला तयार झाली. दासीचा तो मुलगा व लहान अकबर दोघांनाही दासी बरोबरच दूध पाजत असे.
दासीच्या मुलाचे नांव हुसिफ होते. हुसिफ व बादशहा अकबर दोघांनीही एकाच स्त्रीचे दूध पिले होते. त्यामुळे ते दूध-भाऊ झाले होते. बादशहा अकबरला पण हुसिफ बद्दल आपुलकी व प्रेम वाटत असे.
काही वर्षे लोटली. अकबर बादशहा झाला व देशाचा सर्वाधिक शक्तीशाली सम्राट बनला. परंतु हुसिफ एक साधारण दरबारी पण बनू शकला नाही. हुसिफची मैत्री जुगारी मित्रांबरोबर होती व काही असे मित्र पण त्याच्याबरोबर होते जे विनाकारण फालतुचे पैसे उडवत असे.
एक वेळ अशी आली कि जेव्हा हुसिफजवळ दोन वेळचे भोजन करण्यासाठी पण पैसे नव्हते. लोकांनी तेव्हा त्याला अकबर बादशहाकडे जायला सांगितले.
हुसिफने अकबरकडे जायची तयारी सुरू केली.
हुसिफ दरबारात पोचल्यावर अकबरने त्याची अशी गळा भेट घेतली, जसा कि तो त्याचा सख्खा भाऊच आहे. खूप काळानंतर हुसिफला बघून अकबर खूप खुश झाला. अकबरने त्याची सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शविली.
अकबरने हुसिफला दरबारात नोकरी दिली व रहाण्यासाठी मोठे घर, नोकर-चाकर, घोडागाडी इत्यादी पण दिले. स्वखर्चासाठी त्याला प्रत्येक महिन्याला एक मोठी रक्कम मिळत असे.
आता हुसिफचे जीवन आरामात व चैनीत जात होते. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती.
‘जर तुझ्या आणखी काही गरजा असतील तर संकोच न करता सांग, सर्व पूर्ण केल्या जातील.’ अकबरने हुसिफला सांगितले.
तेव्हा हुसिफने उत्तर दिले, ‘आत्तापर्यंत आपण जे काही दिले आहे ते शाही जीवन जगण्यासाठी खूप आहे महाराज. आपण आत्तापर्यंत मला मानसन्मान दिला व ताठपणे जगण्याची उमेद दिली. माझ्यापेक्षा जास्त आनंदी दुसरा कोण असेल. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कि देशाचा सम्राट मला आपला भाऊ मानतो. आणखी काय पाहिजे मला तुमच्याकडून.’
हुसिफ डोके खाजवत बोलला, त्याच्या ओठावर उपकाराचे स्मित हास्य होते. परंतु वाटत होते की त्याला आणखी काही पाहिजे आहे. तो बोलला, ‘मला असे वाटते की बिरबल सारखा बुध्दिमान व योग्य व्यक्ती माझ्याबरोबर असावा.’
माझी अशी इच्छा आहे की जसा बिरबल तुमचा सल्लागार आहे तसेच मला पण सल्ला देणारा कोणीतरी पाहिजे.
बादशहाने हुसिफच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले. त्याने बिरबलला बोलविले. व बिरबलला सांगितले. ‘हुसिफ आम्हाला भावासारखा आहे मी त्याला सोयीस्कर जीवन जगता यावे म्हणून सर्वकाही दिले. परंतु त्याला बोलण्यासाठी तुझ्यासारखा हुशार व्यक्ती पाहिजे.’
तर तू असा व्यक्ती शोध जो तुझ्यासारखा असेल जसा की तो तुझा भाऊ असेल जो माझ्या भावासाठी योग्य असेल.
‘तुला माझे म्हणणे समजले का बिरबल’?
‘होय महाराज!’ बिरबल बोलला. ‘तुम्हाला असे वाटते की मी एक असा व्यक्ती शोधून आणू जो माझ्या भावासारखा असेल.’
‘बरोबर’ अकबर बोलला.
आता बिरबल विचार करू लागला की असा कोण असू शकतो जो त्याच्या भावासारखा असेल. हुसिफ भाग्यशाली आहे ज्याला अकबर आपला भाऊ मानतो व त्याला सर्व सुख सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु बिरबलला हुसिफची ही मागणी आवडली नाही, की त्याच्याजवळ पण बिरबल सारखा सल्लागार हवा.
अकबर बिरबलचा खूप सन्मान करत असे व बिरबल पण बादशहावर प्रेम करत असे. परंतु हुसिफ या लायकीचा नव्हता. आता बिरबल विचार करत होता की ही समस्या कशी सोडवावी. तेव्हा जवळ असलेल्या पशु शाळेतून बैलाचा ओरडण्याचा आवाज आला. बिरबल लगेच उभा राहिला शेवटी त्याला त्याच्या भावासारखा कोणीतरी मिळाला होता.
दुसऱ्या दिवशी त्या बैलाला बरोबर घेऊल बिरबल महालात गेला व बादशहा समोर जाऊन उभा राहिला.
‘तू आपल्या बरोबर बैलाला का आणले आहेस, बिरबल?’ अकबरने विचारले.
‘महाराज, हा माझा भाऊ आहे.’ बिरबल बोलला, ‘आम्ही दोघ एकाच आईचे दूध पिऊन मोठे झालो आहोत. गोमातेचे दूध पिऊन. यामुळे हा बैल माझ्या भावासारखा आहे… दूध-भाऊ. हा फार कमी बोलतो. जो याचे बोलणे समजून घेतो, त्याला हा बहुमूल्य सल्ला पण देतो. हयाला हुसिफला देऊन टाका माझ्या सारखा सल्लागार मिळविण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊन जाईल.’
बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबरला आपल्या चुकिची जाणीव झाली. तेव्हा त्यांना वाटले की जसे त्यांच्या सारखा दुसरा कोणी नाही तसेच बिरबल सारखा पण दुसरा कोणी नाही.
Recent Comments