बुंद से गई वो हौद से नहीं आती
बादशहांच्या वाढदीवसानिमित्त दरबारात सर्व सजावट करण्यात आली होती. प्रत्येकाला अत्तर लावून पान सुपारी देण्यात येत होती. तिथे आलेल्या एका राजाला अत्तर लावताना बादशहा कडून एक थेंब गालीच्यावर पडला त्याने तो टिपून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो गालिच्यात जिरून गेला हा प्रकार शेजारी बसलेल्या बिरबलाने पाहिले.
बिरबलाला वाटले एवढा मोठा बादशहा आणि एका राजा समोर थेंबभर अत्तरासाठी धडपडतोय.
बिरबलाच्या मनात काय चालले आहे. ते बादशहानी ओळखले. आता उदया बिरबलाला हौदभर अत्तर दाखवतो.
दुसऱ्या दिवशी बादशहाने राजवाडयातील एका हौदात अत्तर ओतले आणि दवंडी पेटवली… ज्यांना हवे त्यांनी पाहिजे तेवढे अत्तर घेऊन जावे. अनेक जण बादशहाचे गुणगान करत अत्तर घेऊन जात होते.
बादशहा काय बिरबल कसकाय मजा येत आहे ना. बिरबल-महाराज! बुंद से गई वो हौद से नहीं आती.
एका थेंबाने जी अब्रू गेली ती हौदभर अत्तराने भरून येणार नाही असेच बिरबलाला सुचवायचे होते.
Recent Comments