बिरबल कन्येने दाखवला प्रताप
बादशहाने एकदा आपल्या मंडळीना तीन प्रश्न विचारले
(१) ईश्वर कोठे राहतो ?
(२) त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
(३) तो काय करू शकतो ?
ईश्वरा बाबतीतील हे प्रश्न अतिकठीण म्हणून दरबरातील सर्व मंडळी गप्प बसली फक्त बिरबल म्हणाला-महाराज, या प्रश्नांची उत्तरे देण्यास मला तीन-चार दिवसांचा अवसर द्या. बादशहाने त्याचे म्हणणे मान्य करताच बिरबल घरी गेला व त्या प्रश्नांबाबत विचार करु लागला. त्याला पाहून त्याची मुलगी म्हणाली-पिताश्री, आपण कसला विचार करत आहात?
बादशहाने विचारलेले प्रश्न तिला एकवताच ती म्हणाली फक्त एवढंच ना ! पिताश्री, आपण काळजी करू नका. पुरुषवेष धारन करून उद्या मी दरबारात जाते आणि महाराजांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देवून येते. मात्र उद्या तुम्ही आजारी असल्याचे नाटक करा.
यानंतर दुसऱ्या दिवशी दोन वस्तू ऐका पिशवीत ठेवून ती पिशवी हाती घेऊन ती बिरबलकन्या एका तरूणाचा वेश धारण करून दरबारात आली आणि बादशहाला मुजरा करीत म्हणाली – महाराज, मी बिरबलजींचा नाते वाईक असून त्याच्याकडे शिकण्यासाठी आलो आहे. बिरबलजी आजारी असल्याने येणार नहित तेव्हा त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे.
पण माझी एक विनंती आपण मान्य करावी. मी जरी आपल्यापेक्षा वयानं लहान असलो तरी मी आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन होई पर्यंत मी आपला गुरु आहे. म्हणून आपण मला उच्च स्थानावर बसवावे आणि आपण माझे शिष्य अशा नात्याने तात्पुरते खाली माझ्यासमोर बसावे. म्हणजे मी आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईन.
मुलीच्या म्हणण्या प्रमाणे झाल्यावर बादशहाने प्रश्न विचारला..
गुरुदेव ईश्वर कोठे राहतो?
असा प्रश्न करताच आपल्या जवळच्या पिशवीतून एका दह्याने भरलेले गाडगे बाहेर काढून त्या तरूणाने बादशहाला विचारले – शिष्योत्तमा या दह्यात लोणी कोठे आहे?
बादशहा – गुरुदेव या दहयातील अणूरेणूत लोणी भरलेले आहे.
तो तरून – तर मंग ईश्वर सुद्धा विश्वाच्या अणूरेणूत भरलेला आहे.
बादशहा – त्या ईश्वराचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
तरून-पिशवीतील एक मेणबत्ती काढून ती पेटवीत शिष्योतमा या मेणबत्तीच्या जोतीचे तोंड कोणत्या दिशेला आहे.
बादशहा – या जोतीचे तोंड सर्व दिशांकडे आहे.
तरून – तर मग ईश्वराला सुद्धा सर्वकडे लक्ष दयाव लागत असल्याने त्याचे तोंड म्हणजे त्याची दृष्टी सर्व दिशांकडे असते.
बादशहा – गुरुदेव माझा तिसरा प्रश्न ईश्वर काय-काय करतो ?
तरून – इथेच पहा ना परमेश्वराने माझ्या सार्खे यःकक्षित तरूनाला सिहासनावर बसवले आणि आपल्यासारख्या सम्राटाला माझ्यासमोर अदबीने बसण्यास भाग पाडले. अशा प्रकारे परमेश्वर गोष्टी शक्य करून दाखवतो.
बादशहा – (हात जोडीत) गुरुदेव, आपण सामान्य तरून नाही तेव्हा आपण खरे कोन आहात?
तरून – महाराज, आपण म्हणता ते खरे आहे मी सामान्य तरून नाही तर मी एक सामान्य तरूणी आहे. कारण मी बिरबलकन्या तेजस्विनी आहे.बिरबल कन्येच्या या खुलाशाने बादशहाला अपार आनंद झाला आणि तिला अति मोल्यवान वस्त्रालंकार देवून मोठ्या सन्मानाने तिला तिच्या घरी पाठवले.
Recent Comments