बिरबलाची खिचड़ी
हिवाळ्याचे दिवस होते कडाकयाची थंडी पडली होती. बिरबल व बादशहा फिरत-फिरत तळ्याजवळ आले.
बादशहा – कोण शुर या गार पाण्यात उघडया अंगाने उभा राहील.
बिरबल – मनुष्य पैशासाठी काहीही करू शकतो. असा मनुष्य भेटला तर काय देणार.
बादशहा – एक हजार मोहरा देईन. बिरबल गावातील एका गरीब धोब्याकडे गेला.
बिरबल – तू रात्रभर थंड पाण्यात उभा राहीला तर बादशहा तूला एक हजार सोन्याच्या मोहरा देईल. तूझे जन्मांचे दारिद्र संपेल.
धोबी – हो, मी तयार आहे. दोघे बादशहाच्या महालात जातात.
बादशहा – खरचं तू रात्रभर थंड पाण्यात उभा राहशील? ते ही उघड्या अंगाने?
धोबी – हो महाराज, सुर्य उगवला व धोबी पाण्यातून बाहेर आला.
धोबी – मी जिंकलो मला बादशहाकडे घेऊन चला असे शिपायाला सांगितले.
बादशहा – तू खरचं रात्रभर पाण्यात उभा राहिला होतास? आणि तेही रात्रभर इतक्या कडाक्याच्या थंडीत तू हे कस काय केले.
धोबी – रात्र भर रस्त्यावरच्या दिव्याकडे बघून मी ध्यान करत उभा राहीलो होतो.
बादशहा – तरीच! दिव्याची ऊब तूला मिळाली म्हणूनच तू रात्रभर उभा राहू शकलास. तुला बक्षीस मिळणार नाही.
निराश होऊन तो गरीब धोबी बिरबलाकडे आला व त्यान झालेला प्रकार सांगितला.
बिरबल – तूला ठरलेले बक्षीस मिळवून देण्याची जबाबदारी माझी.
दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात वेळेवर आला नव्हता.
बादशहाने एका शिपायाला बिरबलाच्या घरी पाठवले व बिरबलाला घेऊन येण्यास सांगितले.
शिपाई – सरकार ते खिचड़ी शिझवत आहेत. ती शिजली की येणार आहेत.
खूपच उशीर झाल्याने शिपायाला परत पाठवले . पुन्हा शिपायाने तोच निरोप राजाला सागितला. खिचड़ी शिजली की येतो. राजा विचारात पडला. असली कसली खिचड़ी शिजवत आहे. राजा स्वतः पाहण्यासाठी गेला. बादशहा बिरबलाच्या घरी पोहचला. त्याला अजब प्रकार पहायला मिळाला. तिन काठयांच्या वर उंच मडकयात बिरबल खिचड़ी बनवत होता.
बादशहा – अरे जमीनीवर जाळलेल्या काटकयांची उष्णता एवढ्या उंचावरील मडकयापर्यंत कशी पोहचणार. आणि तूझी खिचड़ी कशी शिजणार.
बिरबल – न शिजायला काय झाले तळ्यातल्या माणसाला रस्त्या वरील दिव्यापासून उष्णता मिळू शकते तर मग माझ्या खिचडीला इथल्या इथं उष्णता का मिळणार नाही.
बादशहाला आपली चूक समजली व त्याने त्या गरीब धोब्याला बक्षीसाची रक्कम दिली.
Recent Comments