बिरबलचा गुरु
बादशहा -बिरबल तू एवढा हुशार तर तुझे गुरु किती हुशार असतील? मला त्यांना भेटायचे आहे.
बिरबलाला गुरु नसल्यामुळे तो पेचात पडला, पण लगेच त्याला एक युक्ती सुचली.
बिरबल – महाराज ते सध्या हिमालयात साधने साठी गेले आहेत, कधी येतील काही सांगता येत नाही.
बादशहा – ते काही सांगू नकोस एका महिन्याच्या आत गुरुशी माझी भेट घडवून आणण्याची जबाबदारी तूझी..
बिरबला ने शेजारच्या गावातून एक कलाकार बोलवला.
बिरबल – हे पहा मी सांगतो तसे कर. मी तूला त्या बदल्यात शंभर मोहरा देईन.
कलाकार – ठिक आहे.
मग बिरबलाने कलाकाराला नकली दाढी मिथ्या लावून भगवे कपड़े घालायला देऊन त्याला साधू बनवले.
बिरबल – आता तूं गावा बाहेरील देवळात जा व या माळेचे मणी मोजत बस. मी महाराजांना घेऊन येतो तू फक्त एवढच कर की, एक शब्द सुद्धा बोलू नकोस.
बिरबल बादशहाला देवळात घेऊन येतात. बिरबल – महाराज! हे माझे गुरु आहेत. बादशहाने साधूला वाकून मुजरा केला.
बादशहा – साधू महाराज आपला आशिर्वाद हवा आहे. तसेच आपण काही मार्गदर्शन करावे ही आमची इच्छा आहे.
पण तो गुरु काहीच बोलला नाही.
बादशहा चिडून – हे काय? एक शब्दही बोलायचं नाही. हा आमचा आपमान आहे. निघालो आम्ही.
बादशहा बिरबलाला म्हणाले – काय रे एखादा मुर्ख भेटला तर काय करावे.
बिरबलाने उत्तर दिले – गप्प बसावे.
बिरबलाचे हे उत्तर ऐकून बादशहा चपापला नंतर बादशहा ने गुरूचा विषय काढला नाही.
Recent Comments