बादशहाचा पोपट
बादशहाला एका फकिराने पोपट भेट दिला. त्याला तो फारच आवडला.
फकीर – तूझ्या राज्यांची भरभराट होवो हा पोपट तुझ्यासाठीच आणला आहे.
तो पोपट बोलका असल्यामुळे बादशहाला त्याचा लळा लागला. फकिरावर श्रद्धा असल्याने बादशहाने त्याची देखभाल करण्यासाठी खास नौकर ठेवला. दरबारात जाताना तो पोपटाला भेटून जायचा.
बादशहाने नौकराला बजावले, नीट लक्ष दे याच्याकडे बरे वाईट झाल्याची बातमी आणलीस तर तूला फाशीची शिक्षा होईल.
बिचारा नौकर खूप घाबरला.
…आणि एके दिवशी सकाळी नौकराने पाहिले की पोपटाची काहीच हालचाल दिसत नाही तो तर मेला आहे.
नौकर घाबरला. आता काय करायचे. त्याला सचेना बादशहाकडे जाण्याचे धाडस होईना त्याने बिरबलाकडे धाव घेतली.
नौकर-आता माझा जीव तूम्हीच वाचवा. बिरबल-काही काळजी करू नकोस मी जातो बादशहाकडे,
बिरबल बादशहाकडे आला व म्हणाला महाराज आपला पोपट मोठा योगी झाला आहे. आकाशाकडे तोंड करून, डोळे मिटून ध्यान करतो आहे. अजिबात हालचाल करत नाही.
हे ऐकून बादशहा चकित झाले. बादशहा व बिरबल दोघे पिंजऱ्याजवळ येतात.
बादशहा-तू स्वत:ला हशार समजतोस आणि पोपट मेला की जिवंत आहे तूला कळत नाही. सरळ सांगायचे ना पोपट मेला आहे.
बिरबल-कसं सांगणार? पोपट मेला अस सांगणायला तूम्हीतरं देहदंडाची शिक्षा देणार आहात.
सर्व प्रकार बादशहाच्या लक्षात आला व तो बिरबलाच्या या युक्तीवर हसू लागला.
Recent Comments