पंडीतजी
संध्याकाळ झाली होती. पाहुणे एक एक करून जात होते. बिरबलच्या लक्षात आले की एक जाडा माणूस लाजाळूपणे एका कोपऱ्यात उभा आहे.
बिरबल त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, ‘मला असे वाटते की तुला काहीतरी सांगायचे आहे, तू संकोच न करता तुला काय समस्या आहे ती मला सांग.’
‘माझी अशी समस्या आहे की मी विव्दान आणि खूप जास्त शिकलेलो नाही.’ तो जाडा माणूस म्हणाला. मी माझे शिक्षण नीट घेतले नाही, मला आता त्याचा पश्चाताप होत आहे. मला समाजाचा एक प्रतिष्ठीत व्यक्ती बनायचे आहे. पण आता खूप उशीर झाला आहे.
‘यात काहीही उशीर झालेला नाही. जर तू कठोर परिश्रम घेतले तर तू चांगला विव्दान बनू शकतो.’ बिरबल बोलला.
‘परंतु, असे शिक्षण घेण्यात वर्षे लागतील.’ तो जाड माणूस म्हणाला. ‘प्रसिध्दी मिळविण्यासाठी मी जास्त काळ प्रतिक्षा करू शकत नाही. सुप्रसिध्द होण्यासाठी सोपी पध्दत असल्यास मला सांगा.
‘प्रसिध्दी मिळविण्याचा असा कोणताही सोपा मार्ग नाही. बिरबल बोलला.’ जर तुला प्रसिध्द व ज्ञानी व्यक्ती बनायचे असेल तर तुला कठोर परिश्रम घ्यावे लागतील व थोडा वेळ थांबावे लागेल.’
‘नाही सर, माझ्यात इतका संयम नाही.’ तो जाड माणूस म्हणाला. मला ताबोडतोब प्रसिध्द व्हायचे आहे व ‘पंडीतजी’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे.
बिरबलला समजले की तो जाड माणूस फक्त पंडितजी म्हणवून घेण्यास उत्सूक आहे.
बिरबल बोलला ‘तुझ्यासाठी एक सोपी पध्दत आहे. उदया मंडईजवळ तू प्रतीक्षा कर. माझे काही माणस तिथे येतील व ते तुला पंडीतजी म्हणून बोलतील व ते पुन्हा पुन्हा तुला जोरात आवाज देतील.
यामुळे मंडईतील सर्व लोकांचे लक्ष तुझ्याकडे जाईल. ते सुध्दा तुला पंडीतजी म्हणून हाक मारायला सुरूवात करतील. ते नैसर्गिक आहे.
परंतु हे नाटक तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तू लोकांनी पंडीतजी आवाज दिल्यावर त्यांच्याकडे रागाने बघशील आणि त्यांच्याकडे दगड मारून फेकशील किंवा तुझ्या हातातील काठीने त्यांना पिटाळून लावशील. परंतु तू एक दक्षता घे! तुला फक्त हल्ला करायचे नाटक करायचे आहे. कोणालाही इजा व्हायला नको.’
दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबलने सांगितल्याप्रमाणे तो जाड माणूस गर्दीने भरलेल्या मंडईजवळ उभा होता. बिरबलची माणस त्याच्याजवळ आली व जोरजोरात त्याला ‘पंडीतजी.. पंडीतजी..!’ म्हणून बोलू लागले.
तो जाड माणूस जमीनीवर पडलेली काठी उचलतो व बिरबलच्या माणसांच्या मागे मारायला धावतो. ते जोरजोरात पंडीतजींना आवाज देत होते. हे बघून लहान मुलांनी त्या जाड माणसाला घेराव घातला आणि पंडीतजी पंडीतजी म्हणून बोलायला सुरूवात केली.
मंडईमध्ये एक मजेदार देखावा तयार झाला होता. जाड माणूस काठी घेऊन लोकांच्या मागे लागला होता व लोक जोरजोरात हसत होते, नाचत होते व पंडीतजी म्हणून त्याला आवाज देत होते.
तो जाड माणूस आता पंडीतजी म्हणून लोकप्रिय झाला होता. जेव्हा पण लोक त्याला बघत असे तेव्हा ते त्याला पंडीतजी म्हणून आवाज दयायला सुरूवात करत असे.
प्रत्यक्षात लोकांना आनंद होत असे जेव्हा तो मुर्खासारखा काठी घेऊन पळत असे. परंतु त्या जाड माणसाला आपण प्रसिध्द झाल्याचा आनंद होत असे.
काही महिने गेल्यानंतर तो जाड माणूस कंटाळला व त्याला असे समजले की लोक आपल्याला आदराने पंडीतजी बोलवत नाही तर ते चेष्टा म्हणून पंडीतजी आवाज देतात.
‘ते मला मुर्ख माणूस समजतात का?’ त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला. हया विचाराने त्याला खूप त्रास होऊ लागला त्यामुळे तो पुन्हा बिरबलला जाऊन भेटला.
‘मला फक्त पंडीतजी म्हणवून घेणे आवडले नाही. तो बिरबलला बोलला. काही दिवस लोक मला पंडीतजी म्हणत हे मला आवडले व त्याचा मला आनंद होत असे. परंतु मी आता कंटाळलो आहे. लोक माझा आदर करत नाही ते फक्त मला चेष्टा म्हणून बघतात.
जाड माणसाचे हे बोलणे ऐकून बिरबल हसला व बोलला. मी तुला बोललो होतो की, ‘ तू जास्त काळापर्यंत विव्दान असल्याचे भासवू शकत नाही. तू जे नाही ते तुला लोक कस काय म्हणतील? ’
आता तू दुसऱ्या एका गावात जा व काही महिने तिथे थांब. जेव्हा तू परत येशील तेव्हा जे लोक तुला चेष्टा म्हणून पंडीतजी असा आवाज देतील त्या लोकांकडे दुर्लक्ष कर.
तू एक चांगला व विचारी माणूस म्हणून वाग. त्यानंतर लोकांना याची जाणीव होईल की, तुला चेष्टा म्हणून पंडीतजी बोलण्यात काही अर्थ नाही व ते हळूहळू सर्व काही विसरतील.
तो जाड माणूस बिरबलचा सल्ला पाळू लागला. जेव्हा काही महिन्यांनी तो दुसऱ्या गावातून आला तेव्हा लोक त्याला पंडीतजी म्हणून आवाज देत व चिडवत असे, परंतु त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
आता तो जाड माणूस लोकांच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून आनंदी झाला.
Recent Comments