जाताना मुठी उघड्या का?
बादशहा एकदा बिरबलाला म्हणाला – बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, पण या जगातून जाताना त्याच्या मुठी उघड्या का बरे असतात?
बिरबल – महाराज, माणूस जन्माला येताना सभोवतालच्या लोकांना सांगत असतो, मला जे जे घ्यावंसं वाटेल, ते मी माझ्या -मुठीत याप्रमाणे घट्ट पकडून माझं करीन.
पण मरताना मात्र आपल्या मुठी उघड्या ठेवून तो भोवतालच्या लोकांना सांगू पाहतोकी, तुम्ही जगातील वस्तूंचा लोभ धरू नका. आयुष्यभर लोभापायी मी माझ्या मुठी भरल्या. पण त्या सर्व गोष्टी इथेच ठेवून मला रिकाम्या हाताने हे जग सोडावे लागत आहे.
बिरबलाचे हे स्पष्टीकरण ऐकून बादशहा प्रसन्न झाला.
Recent Comments