घडाभर अक्कल
अकबरची व बिरबलाची जीरवण्यासाठी शेजारील राजाने एक पत्र पाठवले, त्यात लिहले होते. आम्हाला घडाभर अक्कल पाहिजे. ती चार महिन्याच्या आत पाठवावी अक्कल नसेल तर तसे कळवावे.
नेहमी प्रमाणे अकबर बादशहाने हे काम बिरबला कडे सोपवले. बिरबलाने थोडा विचार केला व तो आपल्या कामाला लागला. भोपळ्याच्या काही बीया त्याने शेतात लावल्या दोन महिन्यानंतर बिरबलाने लावलेल्या. भोपळ्याचा वेल चांगला वाढला मग बिरबल कुंभाराकडे गेला.
बिरबल कुभाराला म्हणाला – लहान तोंडाचे व मोठ्या आकाराचे पाच घडे बनवून दे. कुंभाराने पाच घडे बनवून दिले.
बिरबलाने वाढत असलेले भोपळे त्या घड्यात सोडले. काही दिवसांनी वाढलेले भोपळे वेलापासून वेगळे करून ते घडे घेऊन बिरबल बादशहा कडे आला.
बिरबल – हे घ्या महाराज, यातील एक घडा शेजारच्या राज्याकडे पाठवून द्या. तसेच त्याबरोबर एक पत्र पाठवा. आपल्या मागणीनूसार घडाभर अक्कल पाठवण्यात आली आहे. घडा न फोडता ती काढून घ्या अक्कल पुरणार नसेल तर तो घडा परत पाठवा आजून चार घडे आमच्याकडे शिल्लक आहेत.
शेजारच्या राजाला कळले की खरच बिरबल सारखा व्यक्ती कोठेही नसेल.
Recent Comments