खरा गुरु
एक पंडित जो रोज राणीला कथा ऎकवण्यासाठी महलात येत असे.व कथेच्या शेवटी रोज सांगत की
“॥राम सुमर ले तो बंधन छुटे॥ “
काही दिवस कथा ऎकल्यावर त्यानंतर एक दिवस पिंजऱ्यातील पोपट म्हणाला,
” ॥यूं मत कहो रे पंडित झूठे॥ “
त्यावेळी तो पंडित मनातल्या मनात गप्प होऊन चुपचाप निघून गेले परंतु आता पोपट खोटे म्हणुन रोज संबोधित करू लागला ते ऎकु पंडिताच्या मनात राग निर्माण होत होता कारण की राणी काय विचार करेल!
या विचाराने पंडित चिंतित झाला होता, म्हणून पंडितजी आपल्या गुरु कडे गेले. गुरुना जे घडले ते सर्व सांगितले,
तेव्हा गुरु स्वतः दुसर्या दिवशी पंडित जी बरोबर कथा सांगण्यास गेले आणि एकांतात पोपटाच्या जवळ गेले व त्यास म्हणाले तु पंडितास खोटे का म्हणतो?
तेव्हा पोपट म्हणाला : मी आगोदर मोकळ्या आकाशात उडत होतो तेव्हा एका आश्रमा वर जाऊन बसलो तेथे सर्व साधू-संत राम-राम-राम बोलत होते, ते ऐकुन मीही राम-राम बोलणे सुरू केले एक दिवस. मी त्याच आश्रम मध्ये राम-राम बोलत होतो तेव्हा एका संताने मला पकडले आणि पिंजर्या मध्ये बंद केले मग मला दोन – चार श्लोक शिकवले.
आश्रमास एका श्रीमंताने संतास फार मॊठी दक्षिणा दान दिली. तेव्हा संताने आशिर्वाद स्वरूपात मला श्रीमंतास भेट दिले, आता मला श्रीमंताने चांदीच्या पिंजऱ्यात ठेवले, माझे बंधन वाढत गेले.
या तुरुंगवासात मी ताजी हवा आणि ताज्या फळासाठी तरसु लागलो. माझी सुटण्याची संभावना राहिली नाही व एक दिवस त्या श्रीमंताने आपले काम करुन घेण्यासाठी उपहार स्वरूपात मला राजास दिले.
राजाने आनंदाने मला घेतले मी राम-राम आणि श्लोक बोलत होतो.
राणी धार्मिक प्रवृत्तिची असल्याने राजा ने मला राणीकडे दिले.
राणीने माझ्यासाठी सोन्याचा पिंजरा बनवला आणि खाण्यासाठी नेहमी किंमती मेवा अन्य फळे, भोज्य पदार्थ मिळत होते त्यामुळे मी मिरची खाणे झाडावर बसून फळास चोच मारून स्वाद घेणे विसरूनच गेलो.
गुरुजी म्हणाले – आज तु खाऊन थोडया वेळाने चुपचाप पडून रहा, थोडेसुध्दा हलु नकोस, आणि जरी हलवले तरी मरणासन्न अवस्था मध्ये पडुन रहा, पोपटाने ही तसेच केले राणीने पिंजरा उघडून त्यास हलवले व बघितले व तिने सेवकास बोलवून सांगितले की हा पोपट मेला आहे त्यास बागेत खड्डा करुन पुरून टाका.
जेव्हा पोपटास घेऊन सेवक बागे मध्ये पोहचले तेव्हा लगेच पोपट आकाशात उडाला व म्हणाला,
” गुरु मिळाला की सर्व बंधने सुटतात, कितीही शास्त्र ज्ञान प्राप्त करा, कितिही जपतप, अनुष्ठान करा, पण खरा गुरु जोपर्यंत मार्ग दाखवत नाही तोपर्यंत मुक्ती मिळणे असंभव.”
Recent Comments