कशी जिरवली
रामू नावाचा एक लाकुड तोडया होता तो लाकडे विकून आपले पोट भरायचा. त्याच्या कडे एक गाढव होते. त्यावर लाकडे लादून शहरात विकण्यास जात असे.
एके दिवशी तो लाकडे घेवून शहरात जात असताना, केस कापण्याचा व्यवसाय करणाऱ्या शिवाने त्याला हाक मारली.
रामू – काय लाकडे ध्यायची आहे का?
शिवा – होय ! काय भावानं देणार ?
रामू – दहा मोहरा.
शिवा – पांच मोहरा देईन.
रामू ने मान्य केले व मोळी खाली ठेवून तो मोहरा घेण्यासाठी थांबला..
शिवा – अरे ठरल्याप्रमाणे सगळी लाकडे कुठे दिली तू?
रामू – अस काय करता सगळी लाकडे दिली आहेत.
शिवा – लबाड़ी करतोस? हया कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा दे.
या सर्व प्रकाराने संतापलेला रामू थेट बिरबलाकडे गेला त्याने झालेली घटना सांगितली.
बिरबल – काळजी करु नकोस. त्याला चांगली अद्दल घडवू त्याची आपण जिरवू. (बिरबलाने रामूला एक युक्ती सांगितली.)
दोन-चार दिवसांनी रामू गाढवावर बसून शिवाच्या दुकाना जवळ गेला.
रामू – उदया माझं लगीन हाय तेव्हा माझे व माझ्या मित्राचे
केस कापायचे आहेत.
शिवा-पांच मोहरा घेईन.
रामू – ठिक आहे. शिवा ने रामूचे केस कापले.
शिवा – आता बोलव तुझ्या मित्राला.
रामू – तो काय बाहेर उभा आहे.
शिवा – बाहेर तर कोणी नाही फक्त गाढव आहे.
रामू – होय! तोच माझा मित्र आहे.
शिवा – मला गाढवाची हजामत करायला लावतोस.
रामू – माझी व मित्राची हजामत करायची अस आधिच ठरल होत ना?
ठरल्याप्रमाणे बिरबल तिथे आला. शिवाने बिरबलाकडे तक्रार केली.
शिवा – सरकार ! मी गाढवाची हजामत करणार नाही.
बिरबल – लाकडाच्या मोळी बरोबर तू रामूच्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा घेतला.
आता ठरल्याप्रमाणे त्याच्या मित्राची हजामत तूला करावीच लागेल.
अशा प्रकारे बिरबलाच्या हुशारीने शिवाची चांगलीच जिरवली.