अर्धा वाटा
राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर एकदा नवीन पहारेकऱ्याची नेमनूक झाली. तो बिरबलाला ओळखत नव्हता. त्याने राजवाड्यात जाणाऱ्या बिरबलालाच अडवले.
पहारेकरी – तुम्हाला आत जाता येणार नाही.
बिरबल – अरे पण माझे तातडीचे काम आहे.
पहारेकरी – प्रत्येक जण असेच सांगून आत घुसण्याचा प्रयत्न करत असतो.
बिरबल – हे बघ, तू नविन दिसतोस. तू मला ओळखलेले नाही वाटते, अरे मी बिरबल आहे. माझे महाराजांकडे काम आहे.
पहारेकरी काही केल्या बिरबलाला आत सोडत नव्हता शेवटचा उपाय म्हणून बिरबलाने एक युक्ती केली.
बिरबल – हे बघ. तू मला आत सोड आत गेल्यावर मला जे काही मिळेल त्यातील अर्धा वाटा तुझा.
हे ऐकून पहारेकरी खूष झाला व त्याने बिरबलाला आत सोडले.
बिरबल आत गेल्यावर बादशहाला एक खूषीची बातमी सांगितली बादशहा खूष झाले व त्यांनी बिरबलाला विचारले.
बादशहा – आम्ही तूझ्यावर खूष आहोत काय मागायचे ते माग.
बिरबल – महाराज! मला शंभर फटके मारावेत एवढीच माझी मागणी आहे.
बादशहा या मागणीने चकीत झाला.
बादशहा – बिरबलाची मागणी पूर्ण करा.
बिरबल – थांबा! माझ्या या मिळकतीत एक जण भागीदार आहे. आधी त्याला त्याचा वाटा द्यावा लागेल.
बिरबलाने प्रवेश द्वारावर घडलेला प्रकार सांगितला.
बादशहाने त्या पहायकऱ्यास बोलावून घेतले व त्यास शिक्षा केली.
अशा प्रकारे बिरबलाने त्या पहरेकऱ्याला आपल्या कर्तव्याची जान करून दिली.
Recent Comments